चंद्रपुर :-विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे समर्थ व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. या योजनेअंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचे आयोजन होत असते. त्यातील एक महत्त्वाचे राज्यस्तरीय शिबिर म्हणजे उत्कर्ष. उत्कर्ष 2023-24 राज्यस्तरीय सामाजिक, सांस्कृतिक स्पर्धा दिनांक 17 मार्च ते 20 मार्च 2024 (Utkarsh 2023-24 State Level Social, Cultural Competition) या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
Selection of Janata College student for Utkarsh.
आनंदाची बाब म्हणजे या शिबिराकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या संघात जनता महाविद्यालयातील स्वयंसेवक क्रांतिवीर सिडाम याची निवड झाली. क्रांतिवीर चा राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा कायमचा उत्कृष्ट राहिलेला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे यावर्षी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत झालेल्या आव्हान या शिबिरासाठी त्याची निवड झाली होती, या शिबिरातील सहभाग अतिशय उत्तम राहिला त्याच्या या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर बलकी, प्रा. गणेश येरगुडे व महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 comments:
Post a Comment