Ads

जागतिक महिला दिनानिमित्य महिला मूर्तीकार रुपाली मोरेश्वर वरवाडे यांचा सत्कार.

राजुरा :-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गांधी चौक राजुरा येथील महिला मूर्तिकार रुपाली मोरेश्वर वरवाडे यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र देशकर, तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, राजुरा तालुका महिला संघटिका विना देशकर, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा सुनैना तांबेकर, नेफडो च्या वन्यजीव संवर्धन समितीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विजय पचारे, तालुका संघटक रवी बुटले, मोरेश्वर वरवाडे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Female idol artist Rupali Moreshwar Varwade is felicitated on the occasion of International Women's Day.
रुपाली वरवाडे यांच्या विवाहानंतर त्यांनी मूर्ती निर्मिती चे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्यात पती व सासूबाई यांनी खूप सहकार्य केले. सुरुवातीला गणेश मूर्तीचे डोळे रंगविणे, शारदा मातेच्या मूर्तीला रंग देणे काम करीत करीत तब्बल दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हजारो मुर्त्या तयार केल्या. पोळ्याला मातीचे व लाकडाचे बैल तयार करणे, कोजागिरी ला शंकर पार्वती ची मूर्ती तयार करणे, आठविचा हत्ती, लग्न समारंभाला लागणारे मातीचे भांडी, रंगबेरंगी माठ तयार करणे याव्यतिरिक्त मेहंदी चे वर्ग, आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करणे शिवाय उत्तम स्वयंपाक करून या व्यवसाया सोबत परिवाराचा सांभाळ सुद्धा करते त्यांच्या या कार्याची, कौशल्याची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे च्या राजुरा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रुपाली वरवाडे यांचा सत्कार केला. पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य या संस्थेकडून सातत्याने सुरू आहे.या उपक्रमात नेफडो संस्थेच्या पदाधिकारी ,सदस्य व संघटकांचे सहकार्य लाभले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment