Ads

नाल्यात कार कोसळून पेट घेतल्याने अज्ञात चालकाचा होरपळून मृत्यू.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-नागपूर चंद्रपूर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळून तिने पेट घेतल्याने आगीत होरपळून एका अज्ञात कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ रोज शुक्रवारला सकाळी सात वाजताच्या सुमारास शहरानजीक असलेल्या कोंढा नाल्यात उघडकीस आली.
Unidentified driver died after the car fell into the drain and caught fire.
या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या मृत चालकाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे रात्रो मध्यरात्रीनंतर 23/ बीएच 68 550 या क्रमांकाची मारुती इग्नेश ही कार नागपूर कडून चंद्रपूरकडे जात असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यावर या कारने पेट घेतला. चालकाने कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेर निघता न आल्याने कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. [3/8, 12:53] Javed Sheikh Bhadravati: घटनास्थळ ला एस डी पी ओ नयोमी साठम ने भेट दिली.फॉरेन्सिक लॅब चंद्रपूर यांना बोलाविले गेले आहे.सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment