Ads

रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी.

जावेद शेख प्रतिनिधी (भद्रावती):-तालुक्यातील चपराळा येथील रहिवासी असलेल्या दोन महिलांना रानटी डुकराने जखमी केल्याचे घटना आज दिनांक 7 फेब्रुवारी ला सकाळी दहा तीस ते अकरा वाजताच्या दरम्यान घडली असून जखमेवर भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उच्चारा करिता त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
Two women seriously injured in wild boar attack.
सविस्तर वृत्त असे आहे की, भद्रावती तालुक्यात चपराळा येथील रहिवासी असलेल्या सरस्वताबाई नवले वय 65 वर्ष व सुनंदा नागपुरे वय 45 वर्ष या दोन महिला चालबर्डी शेत शिवारात असलेल्या नागपुरे यांच्या शेतात कापूस वेचणी करीता जात असताना अचानक समोरून त्यांच्यावर रानटी डुकराने हल्ला केला त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्या महिलांनी आरडाओरडा केला असता त्यांच्या मदतीला सरपंच विलास लेडांगे, मारुती कोंडेकर, ज्ञानेश्वर सिडाम ,हर्षल कुटेमाटे  व कपिल झाडे यांनी धावून जाऊन त्यांना त्याच्या तावडीतून सोडविले व जखमीना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले जखमींवर डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दवाखान्यात जाऊन जखमींची भेट घेतल्याचे माहिती समजते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment