Ads

यंग चांदा बिर्गेडच्या मध्यस्ती नंतर त्या कामगारांचे थकीत वेतन मिळाले

चंद्रपुर :-लॉयड्स मेटल कंपणी अंतर्गत कार्यरत त्री विक्रम या कंपणीने येथील कामगारांचे एक महिण्याचे वेतन थकीत ठेवले होते. याची तक्रार यंग चांदा ब्रिगेडच्या घुग्घूस कार्यालयात प्राप्त होताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती दिली त्यानंतर आ जोरगेवार यांनी कंपणी व्यवस्थापनाशी संपर्क साधत कामगारांचे थकीत वेतन मिळवून दिले आहे. त्यामुळे कामगारांनी आमदार किशोर जोरगेवार आणि यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांचे आभार मानले आहे.
After the intervention of the Young Chanda Brigade, the workers got their due wages
लॉयड्स मेटल कंपणीत त्री विक्रम नामक कंपणी कार्यरत होती. सदर कंपणी अंतर्गत अनेक कामगार काम करत होते. मात्र या कंपणीने काम बंद केले. त्यांनतर लकी कंपणीला सदर कंपणीचे काम देण्यात आले. मात्र लकी कंपणीने जुने कामगार बंद करुन नवीन कामगारांना कामावर घेलते. त्यामुळे त्री विक्रम कंपणीतील कामगारांचे एक महिण्याचे वेतन थकीत राहिले. कामगारांनी कंपणी व्यवस्थापणाची संपर्क केला मात्र त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या सर्व कामगारांनी यंग चांदा ब्रिगेडच्या घुग्घुस जनसंपर्क कार्यालयात संपर्क करत आपली व्यथा मांडली. सदर विषय समजुन घेत यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी या विषयाची माहीत आमदार किशोर जोरगेवार यांना दिली त्यांनतर आ. किशोर जोरगेवार यांनी त्री विक्रम कंपणीच्या व्यवस्थापणाशी संपर्क साधत कामगारांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यास सांगीतले. त्यांनतर कंपणी व्यवस्थापणाने सर्व कामगारांचे एक महिण्याचे थकीत वेतन अदा केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment