Ads

नागरिकांना मतदाना पासून वंचित ठेवणाऱ्यावर कारवाई करा : राजुरेड्डी

घुग्घुस :-चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राची निवडणूक ही 19 एप्रिल रोजी पार पडली सदर निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रचंड उत्साहात नागरिक रखरखत्या उन्हात घराबाहेर पडले मात्र अनेक नागरिकांचे मतदार यादीतुन गहाळ झाल्याने,मतदारांचे नाव डिलीट करण्यात आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले
Take action against those depriving citizens of voting rights: Rajureddy
यासोबतच मतदारांचे नावे त्यांच्या प्रभागाच्या मतदान यादीत नसून संपूर्ण शहरभर अन्य ठिकाणी टाकण्यात आले तर अनेक मतदारांचे नावे चंद्रपूर येथील मतदान केंद्रावर टाकण्यात आले एकंदरीत झालेल्या या भोंगळ कारभाराने जवळपास 10% मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासन कार्यरत असल्याची जाहिरात सतत प्रसारित केली जात असते तर दुसरीकडे प्रत्यक्षात मृतांची नावे यादीत समाविष्ट असून जिवंत व्यक्तीचे नावे यादीतून गहाळ केल्या जात आहे
आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाचे नावे ज्यापद्धतीने कपात करण्यात आली ते नक्कीच कटकारस्थाने करूनच कमी करण्यात आली असल्याने यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच घुग्घूस नगरपरिषदेच्या संपूर्ण अकरा प्रभागाच्या मतदारयादीचे पुनर निरीक्षण व दुरुस्ती करावी व गहाळ झालेल्या नागरिकांची नावे परत मतदार यादीत समाविष्ट करावी अशी मागणी घुग्गूस काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केली आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment