चंद्रपुर :-स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने दिनांक 02/04/2024 रोजी मुखबिरव्दार खबर मिळाली की, एक ईंसम शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर हा त्याचे खाजगी मोटारसायकल ने एम.डी . (मेफोड्रॉन) पावडर घेवुन विक्री करीता बंगल खिडकी, गेट वर येणार आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने
The local crime branch seized MD (Mephedrone) drug from the accused
सदर खबरचे माहिती महेंश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपुर यांना देण्यात आली सदर माहितीची सहानिशा करण्यासाठी सदर ठिकाणी जावुन शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे फुलपॅन्ट खिशात मध्ये एम.डी (मेफोड्रॉन) पावडर वजन 7.68 ग्रॅम व एक होडा अॅक्टीवा असा एकुण 53,040/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पोस्टे रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले.सदरची कार्यवाही मा. सुदर्शन मुम्मका, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, मा. रीना जंनबधु, मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, पोलीस अंमलदार संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, अमोल सावे, गोपाल आतकुलवार, चालक पोलीस अंमलदार रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली.
0 comments:
Post a Comment