चंद्रपूर :- Jawahar Navodaya Vidyalaya जवाहर नवोदय विद्यालय साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील 80 विद्यार्थी पात्र ठरले.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सिंदेवाही तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी पात्र ठरले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत सिंदेवाहिच्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या मात्र घटली आहे.
केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली होती. जिह्यातील एकमेव तळोधी (बाळापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ही परीक्षा होती.
Navodaya Vidyalaya Result Declared- Sindewahi Taluka Top
यासाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनि ऑनलाईन अर्ज भरले, परीक्षेच्या निकालानंतर 80 विद्यार्थी पात्र ठरले , या प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अश्या तीन स्तरावर विद्याथ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते.
यात चंद्रपूर तालुक्यातील 02, भद्रावती 02, वरोरा 10, चिमूर 04, नागभीड 05, ब्रह्मपुरी 09, सिंदेवाही 14, मुल 02, सावली 04, गोंडपीपरी 10, राजुरा 03, कोरपना 05, बल्लारपूर 03, पोंभुर्णा 03 आणि जिवती येथून 04 विद्यार्थ्यांची निवड झाली. मागील वर्षी सिंदेवाही तालुक्यातील 27 विद्यार्थ्यांची निवड झाली होती ती घटून आता 14 वर आली तरीही हा तालुका अव्वल ठरला, विशेष बाब म्हणजे गोंडपीपरी तालुक्याने मुसंडी मारली असून मागच्या वर्षी 03 विद्यार्थी पात्र ठरलेला हा तालुका या वर्षी 10 विद्यार्थी पात्र ठरवून कौतुकास पात्र ठरला.
चंद्रपूर, भद्रावती, मुल, या तालुक्यातून प्रत्येकी 2 व राजुरा, बल्लारपूर, पोंभुर्णा येथील 03 विद्यार्थी पात्र ठरल्यामुळे या तालुक्यावर विशेष मेहनत करण्याची गरज आहे.
0 comments:
Post a Comment