चंद्रपूर :- चंद्रपूर एलसीबीचे पोलीस कर्मचारी संजय आकुलवार यांच्यावर एका विवाहितेने गेल्या वर्षभरापासून धमकावण्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांचा पीसीआर करण्यात आला.
पतीला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून आणखी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन वर्षभरापासून तिचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप शामनगर येथील पीडितेने केला आहे. तिचा नवरा अपघातात जखमी झाला असून तो बेडवर पडला असून तिला 12 वर्षांची मुलगी आहे.
महिलेने मंगळवारी सायंकाळी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी पोलिस कर्मचारी संजय आकुलवार याला अटक केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. न्याय न मिळाल्यास गळफास घेऊन आत्महत्या करू, असा इशारा महिलेने दिला आहे.
0 comments:
Post a Comment