Ads

उत्कृष्ट महिलां मंचची उत्तुंग भरारी

चंद्रपूर :- 31 मार्च रोजी प्रियदर्शनी सभागृहात महिलांचे सुहेतूक मनोरंजन तथा सशक्तिकरण, सबलीकरण या उद्देशाने प्रेरित सौ.छबुताई वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत उत्कृष्ट महिला मंचद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त-जागर स्त्री शक्तीचा ....सत्कार उत्कृष्ट जोडीचा.... भारतीय सणावर आधारित लोक नृत्य - युगलनृत्य( कपल डान्स)व समूह नृत्य स्पर्धा( ग्रुप डान्स)प्रचंड जल्लोषात व उल्हासात पार पडला.
Utkrst Mahila Manch grace the stage
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ.सपनाताई मुनगंटीवार -सामाजिक कार्यकर्त्या भाजपा या होत्या. तर उद्घाटन ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष मुकुंद दुबे होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड,सौ विजयाताई बांगडे यांनी भूषवले. कार्यक्रमास माजी उपमहापौर,राहुल पावडे, संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष,बिज्रभूषण पाझारे,करण कोठारी ज्वेलर्सचे,सिमा कोठारी डॉ. आनंद बेंदले,आकाश शुक्ला, अँड.सौ वैशाली टोंगे,माजी नगरसेवक,राधेश्याम अडाणी या,गोमती पाचभाई,नंदू मामा,मोगरे,जेसी,आय ग्रुपचे अध्यक्ष,राजेंद्र रघाताटे यांचा उपस्थितीत पार पडला. तसेच डॉ.स्नेहल पोटदुखे, डायरेक्टर सोमय्यापॉलिटेक्निक.ग्रुप. अंकिता आंबटकर,साईकृपा प्लायवूड अँड हार्डवेअरच्या संचालक,लोकेश यादव,श्री साई संताजी पेशंट्स संचालक,हषॅल जुमडे, श्री मधुरजी कपूर वंडर चीफ कूक विथ प्राइड संचालक, मधुकर कपूर,अॅड.आशिष मुंदडा,यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.स्पर्धेत एकूण 7 कपल डान्स व 40 ग्रुप डान्सनी म्हणजेच 400ते 450 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला व आपली नृत्य कला,नृत्य कौशल्य मान्यवरांच्या समोर सादर केले.
कपल डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री किरण सौ. रागिनी यांनी पटकावला,तर डॉ.रवी सौ.अर्चना इटनकर ,यांनी द्वितीय तर श्री विजय आणि सौ प्रियंका खनके यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. समूह नृत्य ( ग्रुप डान्स स्पर्धेत) गृही गर्ल्स ग्रुप यांना प्रथम डान्सिंग क्वीन ग्रुप यांना द्वितीय तर नटराज वुमन्स ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला.जुरी ग्रुपच्या परीक्षणातून रजनी अँड ग्रुप यांनी प्रथम क्रमांक डेझलस क्रीयू ग्रुपने द्वितीय तर लेवल अप क्रीयू ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला.विशेष प्रोत्साहन पर अथवा उत्तेजनार्थ पारितोषिक ब्लॉसम ग्रुप. वुमन्स ग्रुप ऑल राऊंडर इंडियन ग्रुप,हिरकणी ग्रुप, महाकाली चंद्रपूर ग्रुप,बी. जी.ग्रुप महिला पतंजली योग मंडळ इत्यादी ग्रुपला प्रोत्साहन पर पारितोषिक प्रदान करण्यात आले. मान्यवरांनी सर्व विजेत्यांचे मोठी रक्कम देऊन कौतुक, गौरव केला.सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाला लाभलेल्या सभागृहातील तुडुंब प्रचंड प्रतिसादात्मक गर्दी पाहून कार्यक्रमाच्या यशस्वी ते बाबत उत्कृष्ट मंचची उत्तुंग भरारी या विशेषनाने मान्यवरांनी कौतुक केले.स्पर्धेचे सूत्रसंचालन सर्वपरिचित मधुर भाषिक प्रज्ञाताई जीवन कर,व सुमधुर वाणीने सर्व प्रेक्षकांचे मने जिंकणारी विशाखा सरणे,यांनी संचालन करून कार्यक्रमाचे उत्साहवर्धन केले.आभार स्नेहल बांगडे यांनी मानले. कार्यक्रमाला लाभलेल्या विराट प्रतिसादाबाबत छबुताई वैरागडे यांनी सर्व सदस्य,महिलांचे सू हृदयतेने धन्यवाद व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,साक्षी कार्लेकर, प्रा.स्नेहल बांगडे,सारिका भुते,प्रा.धनश्री मुसने,किरण बल्की,मनीषा कन्नमवार , पायल अनडेल्लवार,वैशाली कन्नमवार,अर्चना चहारे, आयुशी भुते,जोत्सना येवले, सारिका बोराडे,वसुधा बोडखे,पूजा पडोळे, प्रणिता जुमडे,योगिता धानेवार, अभिलाषा मेंदुळकर,प्रिती लखदिवे,माया खनके,मंगला रुद्रपवार,जयश्री साखरकर, अप्रना चीडे,सुवर्णा लोखंडे यांनी अतिशय परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment