सादिक थैम वरोरा :-तालुक्यातील करंजी नदीघाटवर 3 एप्रिल रोज बुधवारला दुपारी काही इसम अवैद्यरीत्या रेती उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचे पथकाने करंजी नदीघाटवर जाउन कारवाई केली असता,संदिप मुरलीधर दाते रा. करंजी, सचिन पांडुरंग खोके, रा. करंजी अनिकेत दशरथ दाते रा. करंजी, करण पंढेरी माथनकर रा. करंजी, किशोर विनायक लेनगुरे रा.मुल,संदिप पुंडलिक ठाकरे रा.मुल, दिपक मनोहर लेनगुरे रा.मुल हे सातजण करंजी येथील नदीघाटातून अवैद्यरीत्या रेती उत्खनन करून, ट्रॅक्टर मध्ये भरत असतांना आढळून आले. त्यामुळे यावेळी करंजी येथील नदिघाटातून १ ट्रॅक्टर, ०५ मोबाईल, व १ ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी या ७आरोपी विरूध्द कलम-३७९,३४ भादवि,सहकलम-४८ महाराष्ट्र महसूल अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरोरा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैद्य धंदे करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आली असून जानेवारी ते मार्च या तीन महीन्यांमध्ये अवैद्य वाळु वाहतुक/उत्खनन करणारे २८ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून २,४१,०२,९००. रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच अवैधरीत्या दारू विक्री व दारू वाहतुक करणाऱ्या 99 आरोपींकडुन, ७,०२,५४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर जुगार खेळणाऱ्या 68 आरोपींकडून, २७,९०,१२० रूपयाचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे ६ सुगंधित तंबाखु विक्रेता व वाहतुक दारांकडून २७,१९,१८८ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १४ गोवंश तस्करी करणाऱ्यांकडून ८४,३३,५१५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २४० जाब देणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
या सर्व कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक, रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली, येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक नयोमी साटम व पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचेसह येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारींनी केली आहे.
आगामी निवडणुकीच्या काळात गुन्हे करणाऱ्यांवर पोलीसांचे बारीक लक्ष असुन, अवैद्य धंदे व गुन्हे करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment