चंद्रपूर : गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका आरोपीच्या तुरुंगातून बाहेर काढतो असे आमिष दाखवून बळजबरीने आरोपीच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील संजय आतकुलवार याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या संजय आतकुलवार न्यायालयीन कोठडीत आहे. परंतु, त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पीडितेने मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
The support of those two policemen from the system in the case of violence against women
पीडितेचा पती एका गुन्ह्यात आरोपी आहे. तो कारागृहात शिक्षा भोगत असताना एलसीबीतील पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार याने पीडितेशी संपर्क वाढविला. यानंतर त्याने पतीला गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आमिष दाखवून, धमकावून बळजबरीने संपर्क वाढविला. यानंतर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. अनेकदा त्याला छळाला विरोध केला. परंतु, कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी देत त्याने मागील काही महिन्यांपासून सतत अत्याचार केला आहे. तो अत्याचार करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेतीलच पोलीस कर्मचारी प्रांजल झिलपे आणि कुंदनसिंग बावरी हे घरासमोर पाहरेकरी म्हणून उभे असायचे. अत्याचार वाढत गेल्याने २ एप्रिल रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी तिघांचेही नाव पोलिसांना सांगितले. परंतु, एका महिला अधिकाऱ्यांनी दबाव टाकून पोलीस खात्याला बदनाम करू नको असे सांगत एकाचेच नाव नोंदविले.
यानंतर ३ एप्रिल रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास कुंदन बावरे आणि प्रांजल झिलपे यांनी घरी येऊन तक्रार मागे घेण्यास गळ घातली. तक्रार मागे घेतली नाही. तर रात्रीतून तुझे कुटुंब गायब करू, त्यांच्यासोबत काय होईल याची कल्पना तुला नाही अशी धमकीच दिली. त्यामुळे दोन पोलीस कर्मचाऱ्यांपासून कुटुंबाला धोका असल्याने आणि अत्याचार प्रकरणात सहआरोपी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पीडितेने पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, याबाबतची तक्रार तिने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्याची माहिती तिने पत्रकार परिषदेत दिली. परंतु, अद्यापही या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.
0 comments:
Post a Comment