Ads

महानिर्मिती कंपनी येथिल तंत्रज्ञ-3 पदाची रिक्त पदे तात्काळ भरा.- आ. प्रतिभा धानोरकर यांना निवेदन सादर.

राजुरा 31 मे:-महानिर्मिती कंपनी मधील तंत्रज्ञ-3 पदाविषयक चर्चा संदर्भात प्रतिभा धानोरकर आमदार यांची चंद्रपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन याबाबत निवेदन देऊन सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
In MAHAGENCO Company Technician-3 Vacancies to be filled immediately.- Submission to Pratibha Dhanorkar.
2019 वर्षापासून तंत्रज्ञ-3 या पदाची जाहिरात अजूनपर्यंत शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली नाही. करिता माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती घेतली असता 29 जानेवारी 2024 च्या पत्रानुसार या पदाच्या जवळपास 1953 जागा रिक्त आहेत. नुकतेच मागील 14 मार्च 2024 च्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध मार्फतिने महानिर्मिती कंपनी विभागाने 800 जागा भरण्याचे सूचित केले असून या कमी जागेमुळे आयटीआय विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय शासनाकडून होत आहेत.जागा जास्तीत जास्त 1300-1400 रिक्त जागा भरण्यात यावे.
म्हणून आपली संवेदना मानवी कौशल्य आणि विकास बहुउद्देशीय संस्थेच्या निवेदनाच्या माध्यमातून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या लक्षात आणून देण्यात आले. ऊर्जा विभागाशी चर्चेकरिता विषय लावून लवकरच रिक्त जागेचा मार्ग मोकळा करू असे प्रतिभा धानोरकर यांनी आश्र्वासित केले. यावेळी निवेदन देताना मानवी कौशल्य आणि विकास बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी सौरभ मादासवार, सागर कातकर आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment