घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
पांढरकवडा येथील रजनीकान्त बोरेले व्हिसल ब्लोअर तथा सामाजिक कार्यकर्ता यांनी घाटंजी तालुक्यातील शेतकरी यांची ज्वारी नाफेड मार्फत खरेदी करण्याची मानसिकता दिसत नसल्याने घाटंजी तालुक्यातील शेतकरी यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे आरोप बोरेले यांनी केले आहे.
No Nafed Great millet purchase in Ghatji. Farmer's death - Rajinikanth Borele's allegation
पुढे रजनीकान्त बोरेले म्हणाले खरेदी विक्री संघ किवा कृषी उत्पन्न बाजार समिति असो हे शेतकरी यांच्या हिता साठी निर्माण झाली असून ती शेतकरी यांच्या बापची आहे. जनू काही राजकीय पुढारी, व्यापारीकिवा दलाल यांच्या हिता करीता नाही आहे.
केळापुर तालुक्यात नाफेड ची खरेदी करिता ऑन लाइन सात बारा कायदेशीर प्रक्रिया खरेदी विक्री संघ कार्यालय पूर्ण झाली आहे.
परंतु घाटंजी तालुक्यात शेतकरी यांच्या ज्वारी खरेदी साठी नाफेड ची कोणत्याच प्रकारची तैयारी सकृत दर्शनी दिसून येत नाही. त्या मुळे शेतकरी हवाल दिल झाले असून त्यांनी ज्वारी कुठे विकावी.असा प्रश्न शेतकरी यांना पडला आहे. नाफेड चे ज्वारी चे प्रति क्विंटल दर 3180 रुपये इतके आहे.आणि खाजगी व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी प्रति क्विंटल 1500 रु. ते 2200, रुपये पर्यंत जात आहे.शेतकरी यांना पैशयांची गरज असल्याने मीळेल त्या भावात शेतकरी ज्वारी विकत आहे.त्या मुळे शेतकरी आर्थिक नुकसान होत असून शेतकरी यांचे शोषण केले जात आहे. शेतकरी यांच्या आर्थिक पिळवनुक याला जवाबदार शेतकरी यांनी निवडलेल्या पुढारीच आहे दूसरे कोणीच नाही. हे विशेष
नाफेड केळापुर तालुक्यातील शेतकरी यांची ज्वारी खरेदी करणार आणि घाटंजी तालुक्यातील शेतकरी यांची ज्वारी खरेदी करीता नाफेड उदासीनता दाखवीत आहे.आसा "सावत्र" भेद भाव करीत आहे.ही खुप मोठी शोकांतिका असून संशोधनचा विषय असल्याचा आरोप रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी केला घाटंजी येथे सुद्धा नाफेड ने शेतकरी यांची ज्वारी खरेदी करावी अशी मागणी वृत पत्राच्या माध्यमातून बोरेले यांनी केली आहे .
0 comments:
Post a Comment