Ads

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची गोवंश तस्करां विरूध्द धडक कारवाई

चंद्रपुर :- पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचेचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांना दिले. त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंदपुर यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Local Crime Branch, Chandrapur has taken action against cattle smugglers
दिनांक 03/05/2024 रोजी रात्रो पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि. मुल मार्गे एक अवैधरीत्या कत्तलीकरीता जनावरे कोंबुन भरलेला ट्रक CG24 5 7667 हा चंद्रपुर कडे येणार आहे. अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन मुल हद्दीत रेल्वे गेट जवळ नाकेबंदी केली असता एक ट्रक रेल्वे गेट कडे येतांना दिसला त्यास थांबविण्यास सांगितले असता ट्रक रोडच्या बाजुला थांबला तितक्यात ट्रकमधील दोन ईसम अंधाराचा फायदा घेउन जंगलाकडे पळुन गेले. त्यांचा शोध घेतला असता मिळुन आले नाही. ट्रक ड्रायव्हरला खाली उतरवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने आपले नाव नईमउद्दीन करीमउद्दीन शेख वय 39 वर्षे रा. शांतीनगर, घुग्घुस ता.जि. चंद्रपुर असे सांगितले. व पळून गेलेले ईसम हे 1) असलम शेख 2) इर्शादउल्ला खान दोन्ही राह. मुर्तिजापुर जि. अकोला असे सांगितले. तसेेेच सदर जनावरे कुरखेडा घाट जि. गडचिरोली येथुन आणले असुन सादिक खान रा. गडचांदुर याने आणण्यास सांगितले. सदर ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये गोवंश जातीचे गाय, बैल. गुरे जातीचे जनावरे निर्दयतेने पाय बांधुन कोंबुन असल्याचे दिसले तसेच त्यामध्ये काही जनावरे मृत असल्याचे दिसले. महाराष्ट्रात जनावरे कत्तल करणे, कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणेस प्रतिबंध असतांना सुध्दा सदर जनावरे कत्तलीसाठी ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून कुरतेने निर्दयतेने अवैधरीत्या वाहतुक करीत तेलंगणा राज्यात नेत असल्याचे समजले. सदर ट्रकमध्ये एकुण 37 गोवंश जनावरे त्यामध्ये 4 मृत जनावरे व वाहन किंमत एकुण 16,50,000/-रु (सोळा लाख पन्नास हजार) चा माल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस घटनास्थावरून ताब्यात घेउन आरोपीस पुढील
तपासाकरिता पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच वाहनामधील 33 जिवंत गोंवंश जनावरे यांची देखरेख करण्याकरीता प्यार फाउंडेशन दाताळा रोड, चंद्रपुर येथे जमा करण्यात आले. व 4 मृत गोवंश जनावरांचा पंचासमक्ष पशुवैद्यकिय अधिकारी सा. चंद्रपुर यांचे कडुन पोस्टमार्टग करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले.

सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ऐकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment