भद्रावती( जावेद शेख):-नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादिंमधे मोठ्या प्रमाणात घोळ असल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करुन यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे पुर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव व चन्द्रपुर सम्पर्क प्रमुख किशोरजी राय यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा संघटक अड.युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.
एकीकडे शासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहण करण्यात येते तर दुसरीकडे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मतदारांची नावे यादीतून गहाळ असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ असल्याचे निदर्शनास आले असून अनेक मयत व्यक्तींची नावे अद्यापही यादीत दिसुन येते.यावरुन प्रशासन आपल्या कामात किती बेजबाबदार आहे हे सिध्द होते.केवळ प्रशासनाच्या चुकीमुळेच अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.हि सर्वस्वी प्रशासनाची चुक असून या गंभीर बाबिची गांभीर्याने दखल घेऊन याची सखोल चौकशी करावी व दोषी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन सादर करतांना शिवसेना जिल्हा संघटक अड.युवराज धानोरकर, तालुका संघटक नरेश काळे,शहर प्रमुख तृप्ती हिरादेवे,पंकज लांडगे आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment