Ads

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरु झाला अम्मा की आटो जलसेवा उपक्रम

चंद्रपुर :-चंद्रपूरातील वाढती ऊन लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात अम्मा की आटो जलसेवा हा उपक्रम सुरु करण्यात आला असून या उपक्रमा अंतर्गत शहरातील आटोंमध्ये पाण्याच्या कॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. आज रविवारी गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
Amma ki auto water service initiative was started in Chandrapur from the concept of MLA Kishore Jorgewar
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, सायली येरणे, करणसिंग बैस, विलास सोमलवार, जय मिश्रा, कविता निखारे, रुपा परसराम, सामाजिक कार्यकर्ते विनोद रेब्बावार, आटो चालक मालक राजू एडलावार, विकास रेब्बावार, विठ्ठल कापटे, राजेंना परांडी, बंडु पूरके, नवनीत जिल्लरवार, महेंद्र रामटेके आदीची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेड आणि स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध प्रकारचे स्वयंरोजगार संबंधित शिबिरे, आरोग्य शिबर, सेतु केंद्र, अम्मा का टिफिन, अम्मा की दुकान असे उपक्रम सदर संस्थेच्या वतीने सुरु आहे.
दरम्यान चंद्रपूरातील वाढती ऊन लक्षात घेता आता आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरात अम्मा कि आटो जलसेवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उप्रकमा अंतर्गत शहरातील विविध भागातून चालत असलेल्या आटोमध्ये वाटसरुंसाठी पिण्याच्या पाण्याची कॅन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दररोज ही सेवा सुरु राहणार असून यातुन जलसेवा होणार आहे. ही एक फिरती पाणपोई असून यातून वाटसरुंची तहान भागवली जाणार आहे. आज रविवारी अम्मा च्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. लाल फित कापून या सर्व आटोंना अम्माने हिरवी झेंडी दाखवली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment