Ads

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारूची तस्करी करणा-यावर गुन्हा दाखल....

चंद्रपुर :- पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन , चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध चंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्याअर्नुषगाने पो. नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
A case has been filed against the illegal smuggler of domestic and foreign liquor worth lakhs....
त्यावरून दिनांक ०५/०५/२०२४ सपोनि हर्षल ओकरे व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, सावली परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, नामे विवकी सुरेश गोडसेलवार, वय-२७ वर्ष, धंदा-आर.ओ. प्लॅन्ट, रा. मोखाळा, ता. सावली जि. चंद्रपुर हा त्याचे घरा समोर हुडाई आय-२० कंपनीची वार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ मध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकी करीता साठवून ठेवल्याच्या खबरे वरून नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये १५०० नग देशी दारू, २४ नग रॉयल स्टॅग कंपनीची प्रत्येकी २,००० एम. एल. मापाने भरलेली विदेशी दारू, १०० नग रॉयल स्टैंग कंपनीची प्रत्येकी ९० एम.एल. मापाने भरलेली विदेशी, २४ नग रॉयल कंपनीची प्रत्येकी ३७५ एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, २४ नग आयकॉनीक वाईट कंपनीची विदेशी दारू प्रत्येकी १८० एम.एल. मापाने भरलेली तसेच ४८ नग हेंवई ५००० कंपनीची बियन प्रत्येकी ५०० एम.एल. मापाने भरलेली असा एकुण १,२५,३६०/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ किमंत ८,००,०००/- रूपये असा एकुण ९,२५,०००/- रूपयाचा माल जप्त केला. सदचा माल हा नरसिंग उर्फ नरसिंग अन्ना गनवेनवार, रा. मुल, जि. चंद्रपुर याचा असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, सावली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोहवा/८९८ जयंता चुनारकर, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा /१५३२ सतिश अवयरे, नापोशि/१२२७ चेतन गन्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment