Ads

पोलिसांच्या समय सुचकतेने वाचले वृद्ध इस्माचे प्राण

एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील पेठा, बारसेवाडा तसेच बुर्गी पोलीस ठाणे हद्दीतील गुंडापुरी येथील जादुटोण्याच्या कारणावरून घडलेल्या घटना संपत नाही तोच एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथही आरोपींनी एका ६० वर्षीय वृद्धास मारहाण करून व त्यास जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याचा धकादायक प्रकार पुनः 30 एप्रिल ला गट्टा या गावात निदर्शनास आला असून पोलिसांच्या समयसुचकतेने त्या वृद्धाचे प्राण वाचल्याचे वृत्त आहे.
Old man's life was saved by the police's promptness
दलसू मुक्का पुंगाटी ( ६०) रा.जांभियागट्टा असे बचावलेल्या ईसमाचे नांव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू कोकोसी जोई (६०), झुरू मल्लू पुंगाटी(५४ )बाजू कोकोसी जोई (५५)रेणू मल्लू पुंगाटी (५० ),मैनु दुंगा जोई( ३९ ),शंकर राजू जोई (३१),दिनकर बाजू जोई (२६) तसेच विजू गोटा होळी या आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी रात्री ०८:०९ च्या सुमारास गैर कायद्याची मंडळी जमवून व संगणमत करून जांबियागट्टा येथील फिर्यादी दलसू मुक्का पुंगाटी यास पकडुन, हात पाय दोरीने बांधून लाथा, बुक्क्यांनी व काठाने मारहाण केली. सब्बलने शरीरावर बर्‍याच ठिकाणी डागुण जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचे नशिब बलवत्तर म्हणून एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे, सहाय्यक निरीक्षक शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दलसु मुका पुंगाटी याला आरोपीच्या तावडीतून सुटका करून सोडविले व त्याचा जीव वाचविल्याचे समजते.

त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचार सुरू आहे. आरोपींना दिनांक १ मे पासून ४ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना व अंधश्रध्देच्या कचाट्यात जदुटोना हा आधुनिक डिजिटल देशात घडणारा किळसवाणा प्रकार अंगावर शहारे आणणारा असून आदिवासी भोळ्या भाबळ्या गरीब लोकांना फसवून त्यांचा नाहक जाणारा बळी आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही सुज्ञ नागरिकांत बोबल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment