Ads

अवैद्य सुगंधीत तंबाखु तस्करी करणाऱ्या विरुध्द भद्रावती पोलिसांची कार्यवाही

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० वा सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आस्टुनकर यांना मुखबीरकडुन बातमी मिळाली की, अमोल गेडकर याने विवोर्डी गुरुनगर भद्रावती येथे आशिष वाकडे याचे घरी अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखुची विक्रीकरीता साठवणुक करून ठेवली आहे.
Bhadravati police action against smugglers of uncured flavored tobacco
अशा खात्रीशीर खबरेवरुन सदरची माहीती मा. पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे सा. यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टाफचे मदतीने खबरेप्रमाणे सदर ठिकाणी जावुन आशिष वाकडे याचे घराची पंचासमक्ष कायदेशीररित्या सुगंधीत तंबाखुबाबत तपासणी केली असता त्याचे घराचे बांधकाम सुरू असलेल्या स्वयंपाक खोलीत मजा १०८ सुगंधीत तंबाखु व ईगल सुगंधीत तंबाखु असा एकुण एकुण १,७१,४२०/-रू चा माल अवैद्यरित्या मिळुन आल्याने सदरचा सुगंधीत तंबाखुचा मुददेमाल पंचनामा कार्यवाही करून जप्त करून पो रटे भद्रावती येथे अप कं २८७/२४ कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भादवी सहकलम अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ त्या अंतर्गत नियम कलम ३०(२), (२६) (२) (a), ३, ४, ५९ (१) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी नामे १) अमोल नंदकिशोर गेडकर वय २७ वर्ष रा. डोलारा तलाव भद्रावती, २) आशिष दसरथ वाकडे वय ३० वर्ष रा. चिचोर्डी गुरूनगर भद्रावती यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही उप-विभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे सा., सफौ गजानन तुपकर, पोहवा अनुप आस्टुनकर, नापोअ जगदीश झाडे, निकेश देंगे, विश्वनाथ चुदरी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment