Ads

सदोबा सावळी ला रजनीकांत बोरेले यांची संघटनात्मक सहविचार सभा संपन्न Rajinikanth Borele's organizational consultation meeting concluded at Sadoba Sawali

( प्रतिनिधी)आर्णी : मौजा सदोबा सावळी येथे रजनीकान्त डालूरामजी बोरेले  व्हिसल ब्लोअर तथा सामाजिक कार्यकर्ता पांढरकवडा यांचा विविध  सामाजिक संघटना  व राजकीय पुढारी यांच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन एका विशेष कार्यालयात दि.17/5/2024 ला करण्यात आले होते.
या सभेचे अध्यक्ष  रजनीकांत बोरेले तर  प्रमुख अतिथी जि.प. सदस्य प्रकाश राठोड, माजी जि.प. सदस्य सोनमाजी मंगाम, डॉ कापसे, श्रीमती बेबीताई दरोडे, होते.तर सावळी सर्कल मधील 13, गावातील  सरपंच व उपसरपंच उपस्थित होते सर्वंच्या साक्षी मध्ये प्रकाश राठोड जि .प. सदस्य यांच्या शुभ हस्ते रजनीकान्त बोरेले यांना शाल, श्रीफळ आणि पूज्य संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा भेट देवून त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे.
Rajinikanth Borele's organizational consultation meeting concluded at Sadoba Sawali
         या वेळी रजनीकांत बोरेले यांनी आपल्या एक तासाच्या भाषणातुन उपस्थितांना मंत्र मुग्ध केले विविध याचीकांच्या माध्यमातून जनहितार्थ आणि पोलीस विभाग या सह अनेक शासकीय विभागात झालेल्या भ्रष्टाचार उघड़किस आणण्याचा कार्य केले असून  अनेक भ्रष्ट अधिकारी विरुद्ध कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे.
  या शिवाय उपेक्षित महिला आणि नागरिकांच्या समस्या करीता अग्नि आत्म दहन, जल समाधी, विष प्राषन, अकोला तुरंगात आमरण  उपोषण, शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव करिता रास्ता रोको आंदोलन व सन 2004 मध्ये शेतकऱ्यांच्या हिता करीता याचिका दाखिल नीता मडावी (बोरेले) यांनी केली होती विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मागनी कडे गांभीरतेने घेतले नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा उद्रेक होईल. परन्तु कोणत्याही स्थानीक लोक प्रतिनिधिने लक्ष दिले नाही.परिणामी केळापुर व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या संख्याते झाल्याने विश्व मध्ये या तालुक्यांची प्रतिमा मलिन झाली आहे.
  या व्यतिरिक्त बोरेले यांनी आपल्या भाषनातून इतर अनेक राजकीय पक्षांनी सत्ता भोगली आहे 25 वर्ष , कोणी 10, कोणी 5, वर्ष, प्रतिनिधित्व करुण देखील विकासाचा पत्ता नाही.उद्योग नाही, महिला व नागरिकांना रोजगार नाही.अनेक गावात शुद्ध पिण्याचे पानी व विद्युत चा थांग पत्ता नाही.निम्न पैनगंगाचा वाद विकोपाला गेला आहे शेतकऱ्यांच्या मन विरुद्ध जावून निम्न पैंनागंगाचा काम करण्या मागचा उद्दिष्ट काय ? आहे हे न समजणारे कोड़े आहे. असे सडेतोड टिका सुद्धा आपल्या मनोगतातून केली आहे.
   सत्यासाठी आणि मतदार संघाच्या  मातृभूमीशी प्रामाणिक राहून आपल्या संघटनेला साथ देण्याचे म्हटले आहे .
या वर उपस्थितांनी बोरेले यांच्या संघटनेला समर्थन देण्याचे अभी वचन दिले आहे.यावेळी परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते तर अनेकांनी रजनीकांत बोरेले यांच्या सोबत आठवणी म्हणून छाया चित्र काढली आहे.
विशेष म्हणजे ज्यांनी गटविकास अधिकारी आर्णी येथे घरकुल च्या आर्थिक टप्प्यासाठी त्रस्त येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करत होते ते संतोष बुटले माजी सरपंच माळेगाव हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते
      या संघटनात्मक सहविचार  सभेला यशस्वी करण्या करीता दिलीप राठोड, सुरेश पवार,अमित ठाकरे उपसरपंच कवठा, किशोर चव्हाण पळशी,सुनिल राठोड सरपंच सुभाष नगर ,विकास जाधव उपसरपंच, बारभाई मोहन जाधव सरपंच पळशी, दिलीप राठोड उपसरपंच माळेगाव, विजय मेश्राम सरपंच केळझरा,वरठी बंडु कांबळे उपसंरपंच उमरी (कापे),सुरेश राठोड, आकाश राठोड, दत्ता महाराज, चेतनसिंग राठोड, सुनील राठोड, यांनी अथक परिश्रम घेतले तर विशेष उपस्थिति वासुदेव राठोड जरंग,दिनेश गाऊत्रे (समन्वय महाराष्ट्र माळी मिशन आर्णी विधानसभा) पंकज नरसेकर घाटंजी यांची होती. सूत्रसंचालन, सुरेश पवार व आभार विजय रामगीर यांनी केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment