Ads

शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल.

राजुरा :-संतुलित पर्यावरणासाठी वृक्ष संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने जागतिक वृक्ष दिन, भारतीय वृक्ष दिवस ,जागतिक वन्यजीव सप्ताह,जागतिक पर्यावरण दिन, जागतिक तापमान वाढ,वन सप्ताह, जागतिक निसर्ग संवर्धन दिन असे अनेक दिन मोठ्या थाटामाटात आपण जागतिक पातळीवर साजरे करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो.
परंतू मानवी प्रवास सोयीस्कर व्हावा, प्रगतीला गती प्राप्त व्हावी म्हणून मोठं मोठे रस्त्यांचे जाळे विणले जात असताना बामणी-राजुरा-आसिफाबाद या महामार्गाच्या बांधकामाकरीता राजुरा तालुक्यातील जोगापूर-सुमठाणा जंगल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे ही शोकांतीका असून नव्या महामार्गामुळे जुन्या निसर्गरम्य अशा या राजुरा-वरूर रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या नागरीकांनी व राजुरा येथील निसर्गप्रेमींंनी हळहळ व्यक्त केली आहे.
------------------------------------------
बादल नीलकंठ बेले
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था


मानवाने प्रदूषणाला आळा घालणे अतिशय आवश्यक अशी बाब आहे परंतु निसर्गतः अप्रत्यक्षपणे वृक्षच अतिशय प्रभावीपणे ते कार्य करू शकतात. संतुलित पर्यावरणासाठी जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. परंतु मानवी सोयीसुविधेच्या नावाखाली कशाचेही भान न बाळगता वृक्षांची मोठ्याप्रमाणात कत्तल करून महामार्गाच्या कामाला गती देणाऱ्या मानवाने पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे हे जाणून घेतले पाहिजेत तसेच आपला प्रवास सुखाचा करणारे मोठमोठे मार्ग निर्मिती होत असताना हजारो वृक्षतोड करून आयुष्याचा प्रवास मात्र दुःखद होईल याचा विसर मानवाला पडत आहे.शेकडो वर्षे जुने वृक्ष ही आपली शान आहेत शिवाय निसर्गातील ही हिरवी चादर पर्यावरणाला पूरक आहे. परंतु मानवी प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाची होत असलेली हानी भरून काढणे तितकेच महत्वाचे आहे असे मत बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी व्यक्त केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment