घाटंजी तालुका प्रतिनिधी :-शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली ता.केळापूर जि.यवतमाळ येथे दि.२७/०४/२०२४ ते १/०५/२०२४ समृद्ध व्यक्तीमत्व विकास व बाल संस्कार शिबीर अर्तगत विद्यार्थ्यांत नेतृत्व क्षमतेचा विकास व्हावा ,छंद,अभिनय, नृत्य आवड,कला गुणाची जोपासणा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसीत करावा ? अंधश्रद्धा निमुर्लन, ,त्यांचा बौध्दीक गुणांचा विकास व्हावा यासाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या तिसऱ्या दिवशी मा रुपेश वानखेडे यांनी विविध कृती युक्त खेळ घेऊन विद्यार्थ्याना वैज्ञानिक सिद्धांत पटवून दिले .
Scientific Approach Workshop at Government Secondary Ashram School Sonurli
यावेळी शाळेचे अधिक्षक मा.मनोज गाढवे यांनी यावेळी विद्यार्थ्यावर बालपणातच योग्य संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले या शिबीरात सोनुर्ली व सिंगलदिप येथील जि.प शाळेचे सुद्धा बहुसंख्येने सहभागी झाले आहे. मार्गदर्शक भाविक भगत यांनी व्यक्तीमत्व घडविण्यासाठी बालसंस्कार असणे गरजेचे आहे . असे मत व्यक्त केले.संचालन शिक्षक मा.स्वनिल आत्राम यांनी केले तर कर्मचारी विजय जुनघरी, शिबीराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे .
0 comments:
Post a Comment