घाटंजी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग अंतर्गत बस स्थानक घाटंजी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र व कामगार दिनी घाटंजी येथील बस स्थानक येथे ध्वजारोहण वाहतुक नियंत्रक विष्णू किन्नाके यांच्या हस्ते करण्यात आला.तर कार्यक्रमाचे संचालन पांढरकवडा आगारातील वाहक मंगेश हुड यांनी केले.
Celebrating Maharashtra and Labor Day at Ghatji Bus Station!
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बसस्थानक स्वच्छता करणारे एस.एस.सुरावार कंपनी चे सफाई कामगार विजय नामदेव मोहिजे व कविता विजय मोहिजे यांचा रा.वि.नगराळे,व संतोष पोटपिल्लेवार यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,साडी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बस वाहक मंगेश हुड यांनी आपले मनोगत व्यक्त करीत,सफाई कामगारामुळेच बसस्थानकातील कचरा व साफसफाई असते. सफाई कामगारांमुळे रोगराई नष्ट होते. अहोरात्र प्रयत्न करुन घराप्रमाणे आपले बसस्थानक स्वच्छ रहावे अशी सफाई कामगारांची ईच्छा असते, असे मत मंगेश हुड यांनी व्यक्त केले. यावेळी वाहतूक नियंत्रक शैलेश बी. पाली मधुकर नगराळे, भिमराव ताकसांडे,दादा टेकाम,राजुभाऊ मंगाम, जयविष्णू मडावी, जोशना भारस्कर सुरेश सिडाम,अतुल पंधरे,के.के.धुर्वे,देविदास पराते, संतोष आत्राम,प्रकाश गेडाम, किशोर उईके,आर.डी. मडावी,अविनाश शिवनकर.वाय. मेश्राम,एम.बि.उईके, चालक व वाहक यांच्यासह प्रवाशी आदीं उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment