बल्लारपूर :-चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी आणि विक्रीवर बंदी घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये जिल्हा गुन्हे शाखेने चंद्रपूर शहरात 30 एप्रिल आणि 1 मे रोजी 2 कारवाया केल्या आहेत. 1 मे 2024 रोजी रात्री 8 वाजता बल्लारपूर पोलीस पेट्रोलिंग करत असताना सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यामध्ये बसस्थानक बल्लारपूर परिसरात तपासणी दरम्यान 5 पिवळया प्लॉस्टीक चुंगडीत मध्ये 4 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
Ballarpur police nabs smuggling of banned flavored tobacco worth lakhs in bus station area
या कारवाईत दिनेश नरसैया अंबाला 27 रा. दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्र मुमक्का सुदर्शन सा.,अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु ,. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, वशिष्ठ रंगारी, श्रिनिवास वाभिटकर इतर पोलीस पथकाने केली आहे .
0 comments:
Post a Comment