Ads

कामगार दिनांनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांची भेट

चंद्रपुर :- 1 मे कामगार दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांची भेट घेत संवाद साधला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याच्या सुचनाही उपस्थित अधिका-यांना केल्या आहे.
On the occasion of Labor Day, MLA Kishore Jorgewar met the workers of District General Hospital
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, माया आत्राम, राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल अवार्ड प्राप्त नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जात येथे रुग्ण सेवा देत असलेल्या कंत्राटी कामगारांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या समस्या समजून घेतल्या.
कामगारांशी शिवाय कोणताही विकास शक्य नाही. यातही रुग्णालयात रुग्ण सेवा देत असलेले कामगार हे ईश्वरीय कार्य करत आहे. रुग्णालयात येणा-या व्यक्ती हा दुखात असतो. त्यामुळे आपण अशांसोबत सौजन्यपूर्ण वागुन त्यांच्या चेह-यावर हसु फुलविण्याचे काम आपल्या माध्यमातून अपेक्षित असल्याचे ते यावेळी म्हणाले. येथील सुरक्षा रक्षकांची गार्ड बोर्ड मध्ये नोंद करण्यात यावी, कर्मचा-यांसाठी येथे पाळणाघर तयार करण्यात यावे, कामगारांना नियमित वेतन देण्यात यावे अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या आहे. रुग्णालय प्रशासनानेही येथील कामगारांशी आदराने वागावे असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांना अम्मा का टिफिन भेट स्वरुप दिला. यावेळी कामगार वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment