Ads

अवैद्यरीत्या दारू विक्री करणारे व सटटापटीचा जुगार खेळणारे आरोपी विरूध्द वरोरा पोलिसांची धडक कारवाई

वरोरा तालुका प्रतिनिधी(सादिक थैम ):- दि.०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने, चंद्रपुर जिल्हातील संपुर्ण देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद असल्याने, अवैद्यरीत्या दारू विक्री करणारे व सटटापटीचा जुगार खेळणारे आरोपी विरूध्द कारवाई करणेकरीता, पोलीस स्टेशन वरोरा कडुन आज दि.०१/०५/२०२४ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
Warora police action against the accused who sell illegal liquor and gamble
दारू विक्रीबाबत तीन विविध कारवाई मध्ये दारू विक्री करणारे आरोपी १) विनोद जगणूराम उईके, वय-३३वर्ष, रा. टेंभुर्डा २) स्वप्निल महादेव येसांबरे, वय-३८वर्ष, रा. आष्टा भद्रावती, ३) रविनंदन सुदामप्रसाद तिवारी, वय-४५ वर्षे, रा. जनकपुर, मध्यप्रदेश ४) सागर महादेव मारशेटीवार रा. वरोरा तसेच सटापटीचा जुगार खेळविणारा आरोपी ५) अभय रामाजी ससाने, वय ३० वर्ष, रा. कॉलरी वार्ड, वरोरा यांचे विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. व आरोपीतांकडुन १) १६७ नग रॉयल स्टॅग कंम्पनीचे निपा २३२६० २) ११ नग काल्सबर्ग कंम्पनीची बियर ३३०० ३) ४२ नग हैवर्डस् कंम्पनीची बियर १२६०० ४) १५ नग बडवायझर कंम्पनीची बियर ६००० ५) नगदि ३८००रू. असा एकुण ४५६६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारू विक्री करणारे आरोपीतां विरूध्द कलम ६५ ई, महाराष्ट्र दारूबंदि अधिनियमप्रमाणे ०३ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच सटटापटीचा जुगार खेळविणारा आरोपीविरूध्द कलम-१२ अ, महाराष्ट्र जुगार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील कारवाई श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, पो.हेड.कॉ. दिलीप सुर, पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं. मोहन निषाद, शशांक बादमवार, राजु लोधी, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, संदिप मुळे, पोलीस स्टेशन वरोरा यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment