(प्रशांत गेडाम)नागभीड- सावरगाव - वाढोणा रोडवर दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीवरून महिला खाली पडली. मागेच येत असलेल्या हारवेस्टर च्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.17 मे शुक्रवार दुपारी एक वाजताचे दरम्यान घडली.
तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येतं असलेल्या सावरगाव- वाढोणा रोडवर दुपारी एक वाजताचे दरम्यान नेरी येथुन राजेश बावने व कुसुम उकुंढे वय 50 वर्ष हे दोघेजण वाढोणा येथे मृतकाचे मुलीकडे दुचाकी स्कुटी क्रमांक एम.एच ३४-सि.एक्स.८८७१ या गाडीने जात असताना, हारर्वेस्टर ला ओव्हरटेक करून समोर जात असताना बाजूला ठेवलेल्या रेतीच्या ढिगावरून गाडी स्लिप झाल्याने व गाडीवरून मागे बसलेली महिला खाली पडली दरम्यान बाजुने जात असलेल्या हाॅरवेस्टरच्या मागील चाकाखाली आली असता कुसुम उकुंढे ही महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलिस करित आहे.
0 comments:
Post a Comment