Ads

जी एम आर कंपनी मधून कामावर आलेल्या कामगार बेपत्ता

(सादिक थैम)वरोरा: येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जीएमआर या विद्युत निर्मिती कंपनीत १५ मे रोजी कामावर आलेला कामगार कंपनीतून अचानक बेपत्ता झाला. तो घरी परतला परतला नसल्याने १६ मे रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
Workers from GMR company are missing
वरोरा तालुक्यातील मोहबाळा परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जीएमआर या विद्युत निर्मिती कंपनीमध्ये वरोरा येथील कर्मवीर वार्डात राहणारे अरुण महादेव बोबडे ५४ वर्ष आणि त्यांचा मुलगा कुंदन अरुण बोबडे २७ वर्ष दोघेही दीड वर्षापासून कामगार म्हणून कामावर आहेत. दिनांक 15 मे 2024 रोजी वडील आणि मुलगा दोघांचीही एकाच पाळी मध्ये ड्युटी असल्याने ते सकाळी साडेपाचच्या सुमारास घरून दुचाकीने निघाले. मुलगा आणि वडील दोघेही जीएमआर कंपनी आवारात शिरले त्यानंतर सकाळी ११:३० च्या सुमारास जेवणाची सुट्टी झाली तेव्हा मुलगा कंपनी आवारात आढळून आला. परंतु सुट्टी झाल्यानंतर मुलगा कंपनीच्या बाहेर पडला नाही. तसेच घरी देखील आला नाही. त्याची दुचाकी अजूनही कंपनीच्या वाहन तळ्यामध्ये उभी आहे. सदर कामगार जीएमआर कंपनीत रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स चे काम करीत होता. त्यामुळे तो रेल्वे ट्रॅकच्या मार्गानेच बाहेर पडला असावा असा अंदाज आहे. त्याचा भ्रमणध्वनी देखील बंद आहे. यामुळे तो खरंच कंपनी आवाराच्या बाहेर पडला का की कंपनीच्या आवारातच आहे असा प्रश्न आहे. कंपनीचा परिसर खूप मोठा असून दाट झुडपे देखील वाढलेले आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य राहिलेले आहे. यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान या घटनेची तक्रार मुलाच्या वडिलांनी १६ मे रोजी वरोरा पोलिसात दिली आहे. पोलिसांनी सदर कामगार बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करून घेतली असून तपास सुरू केला आहे. जी एम आर कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असून त्यांच्या मदतीने सदर कामगार कंपनी आवारात आहे की बाहेर पडला याचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment