भद्रावती जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील एकता नगर वसाहतीतील हनुमान मंदिरात चोरी करणारे आरोपी अखेर भद्रावती पोलिसांना गवसले असून याप्रकरणी तीन आरोपींना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून 72 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
Bhadravati Police succeeded in arresting the accused in the theft of Ekta Nagar Hanuman Temple.
शुभम उद्धव धाबेकर वय 26 वर्ष राहणार गवराळा, अनिकेत विनोद देऊरकर वय 21 वर्षे,राहणार दरबान सोसायटीष भद्रावती व योगेश उर्फ गोगो खुशाल गलांडे वय 23 वर्ष राहणार शिवाजीनगर भद्रावती अशी या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिनांक 3 जून 2024 च्या रात्रोला एकता नगर वसाहतीतील हनुमान मंदिरात चोरी झाली होती. याची तक्रार एकता नगर वसाहतीतील रामदास सातपुते यांनी भद्रावती पोलिसात केली होती. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले होते. मात्र आरोपींचा शोध लागला नव्हता. तेव्हापासून भद्रावती पोलीस या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी जवळपास 11 महिन्यानंतर पोलिसांना या घटनेतील आरोपींना पकडण्यात अखेर यश लाभले. या आरोपींकडून मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील तांब्या, दानपेटीतील चोरी गेलेली रक्कम व पल्सर दुचाकी असा 72हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात गजानन तुपकर, अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे यांनी केली.
0 comments:
Post a Comment