भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा-चारगाव रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना दिनांक 1 रोज शनिवारला सकाळी दहा वाजता उघडकीस आली.
The body of a woman was found along the Deulwada-Chargaon road.
सुंदराबाई भाऊराव रासेकर, वय 55 वर्ष, राहणार देऊळवाडा असे या मृतक महिलेचे नाव आहे.सकाळी या रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी याची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या महिलेचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सदर महिला ही देऊळवाडा गावावरून रोज सायकलने लगतच्या एकता नगर वसाहतीत घर कामासाठी येत होती.घटनास्थळाजवळ जंगल सदृष्य भाग आहे. रोजचे काम आटोपून ती आपल्या गावाकडे जात असताना एखाद्या वन्य प्राण्याने तिच्यावर हल्ला केला असावा त्यात तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळाला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम चंद्रपूर एलसीबी चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास भद्रावती स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे पोलीस स्टॉप करीत आहे.
0 comments:
Post a Comment