Ads

बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले कर्ज.

राजुरा:-सोंडो येथील शेतकरी विठ्ठल महादू मेश्राम वय ७५ वर्ष यांची वडलोपार्जित शेतजमीन आहे. सोंडो येथील सर्व्ह नंबर ४२ मधील २४ एकर व सर्व्ह नंबर ५३ मध्ये १० एकर शेतजमीन आहे. यांच्या शेतजमिनीवर याच गावचे सरपंच जयपाल आत्राम व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा या चे शाखा व्यवस्थापक जगन कुंडलिक दुर्गे यांनी संस्थेतून बनावट कागदपत्रे व शेतकऱ्याची सहमती न घेता परस्पर कर्ज घेतले.
मधुकर बाबुराव मेश्राम यांच्या नावाने ६८,४९७ व प्रभाकर बाबुराव मेश्राम यांच्या नावाने ४०,०९० रुपयांचे कर्ज आहे. दोघांचाही मृत्यू झालेला असून सातबाऱ्यावर नाव असलेले विठ्ठल महादू मेश्राम मृतकांच्या नावाचे सोसायटीने नोटीसद्वारे कर्जाची भरणा करण्यासाठी कळविण्यात आले. त्यामुळे हा कर्जाचा बनावट प्रकार शेतकरी विठ्ठल मेश्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या आदेशानुसार २८ एप्रिल २०२४ ला राजुरा पोलीस स्टेशन ला जयपाल मारोती आत्राम, सरपंच रा. सोंडो व जगन कुंडलिक दुर्गे, शाखा व्यवस्थापक ,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.देवाडा यांनी संगनमत करून बनावट खोटे दस्तऐवज, स्वाक्षरी व अफरातफर करून फसवणूक केल्यावरून प्रथम श्रेणी वर्ग १ कोर्ट राजुरा यांचे आदेशानुसार भादवी कलम ४०६, ४२०, ४६५, १२०-ब,४६८ अन्वये गुन्हा नोंद केला असून सध्या दोन्ही आरोपी फरार आहे. या दोन्ही आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेत शेतकरी विठ्ठल मेश्राम यांनी केली आहे. या घटनेचा तपास राजुरा पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment