वरोरा :-नुकताच आलेला अवकाळी पाऊसामुळे (गारपिठ) वरोरा ग्रामिण क्षेत्रातील शेतीमधील तुर, कापुस, चना, गहु तसेच इतर शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन शेतक-यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषगाने झालेल्या नुकसान भरपाईबाबत आपल्या विभागामार्फतीने त्वरीत पंचनामे करुन त्यांचे नुकसान भरपाई मिळवुन देण्याबाबत भारतीय जनता पार्टि वरोरा तर्फे शिष्टमडळ यांनी तहसिलदार, वरोरा यांची भेट घेवुन तालुक्यातील सर्व समस्यावर सविस्तर चर्चा करुन याबाबत निवेदन देण्यात आले, यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामुख्याने शेतक-यांचे नुकसान भरपाई मिळवुन देण्याबाबत तसेच राजीव गांधी निराधार योजनेच्या व श्रावण बाळ योजनेच्या प्रलंबित लाभार्थी याचे प्रकरणाचा निपटारा करावा तसेच ज्या शेतक-याचे ई - केवायसी प्रलंबित आहे याबाबत नियोजनबध्द कार्यवाही करावी व त्यांना योजनेचे लाभ प्राप्त करुन दयावा असे विषय त्यामध्ये नमुद करण्यात आले आहे.
यावेळी भाजपाचे वरोरा विधानसभा प्रमुख रमेष राजुरकर, षहर अध्यक्ष सुरेष महाजन, अमित चवले, अभय मडावी, माजी नगसेवक दिलीप घोरपडे व डॉ.गुणानंद दुर्गे, माजी नगराध्यक्ष विनोद लोहकरे, श्री.प्रविण चिमुरकर, राजेद्र दोडके,राजेष साकुरे, महेद्र सुराणा, प्रकाष दुर्गपुरोहित, मधुसूदन टिपले, संजय राम, अनिकेत नाकाडे, जगदिष तोटावार, कविष्वर मेश्राम, खुषाल बावणे, जगन ढाकणे, सागर कोहळे, पंकज जाधव, कादर षेख, षरद कातोरे, प्रमोद ढवस, स्वप्निल देवाळकर, सारंग किन्हेकार व इतर नागरीक यांचे उपस्थितीत सामुहिक निवेदन देण्यात आले.
0 comments:
Post a Comment