घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-नगण्य विद्यार्थ्यांचे आधार व्ह्यालीड नसल्यामुळे संचमान्यतेनुसार तालुक्यातील शिक्षकांची पदे कमी झाले असून आवश्यक पटसंख्या असूनही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. यापुढील काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्ह्यालिडेशनचे कार्य अग्रक्रमाने करावे तसेच पुढील सत्राचे नियोजन उन्हाळी सुट्टीत पूर्ण करून शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागताचे जंगी स्वागत करण्यात यावे असे मत नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती घाटंजी येथे सर्व केंद्रप्रमुख व बी.आर.सी. साधनव्यक्ती यांची गटशिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाअंतर्गत येणा-या संचमान्यता, शाळापूर्व तयारी, भौतिक सुविधा, समग्र शिक्षा अभियान योजना, शालेय पोषण आहार योजना, जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, पाठ्यपुस्तक वाटप योजना, गणवेश वाटप योजना जिल्हा नियोजन समितीकडून शालेय कामकाजासाठीस येणा-या निधीच्या योजना, पिएमश्री योजना, ई वर्ग जमीन हऱ्हास, वेगवेगळ्या स्पर्धा, विद्यार्थी गुणवत्ता, इत्यादी विषयासंबंधी केंद्रानुसार आढावा घेण्यात आला. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षण विभागातील प्रत्येकाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असून विभागाशी संबंधित प्रत्येकाच्या समस्या सुध्दा यथाशिघ्र सोडविल्या जातील. कामात कसूर करणाऱ्याची हयगय केली जाणार नाही. सर्वांनी आपली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी सुधाकर वांढरे, केंद्रप्रमुख सुनील बोंडे, विशाल सबापुरे, अविनाश खरतडे, अशोक सिंगेवार, संजय तुरक, संजय पडलवार, किसन किनाके, किशोर मालवीय, गजानन मुळे, चंद्रकांत मुनेश्र्वर, रवि आडे तसेच सर्व बी.आर.सी. साधनव्यक्ती उपस्थित होते.
एमपीएससी स्पर्धापरीक्षेद्वारे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांच्या नेतृत्वात घाटंजी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून जिल्ह्यात आपला तालुका सर्वच बाबतीत कसा अव्वल राहील यासाठी टीमवर्क महत्वाचे आहे.
सुधाकर वांढर (विस्तार अधिकारी)
0 comments:
Post a Comment