(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:- सिंदेवाही - रामाला गडबोरी - वासेरा प्र. जि. मा. क्र-43 रामाळा ते गडबोरी दरम्यान आंबोली- रामाळा मार्गावर असलेल्या बोकोडह नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नसून सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आले आहे.
Change in traffic on Sindewahi - Ramala - Gadbori-Wassera main district road.
परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होवू शकतो किंवा पूराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक रामाळा ला जाणेकरीता सिंदेवाही शहरातील (इंदिरा नगर ) वरून टेकरी-वानेरी जाने व सिंदेवाही ला येन्याकरीता रामाळा वानेरी- टेकरी मार्गाचा उपयोग करावे तसेच वासेरा ला जानेकरता टेकरी-वाकल -जामसाळा मार्गाचा उपयोग करावा.
अशी माहिती उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही यांनी दिली आहे.
0 comments:
Post a Comment