Ads

भद्रावती तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील शेतकऱ्यांची आत्महत्या.

जावेद शेख भद्रावती तालुका प्रतिनिधी:- मौजा डोंगरगाव खडी येथील शेतकरी नामे विजय मारोती बोथले रा. डोंगरगाव खडी पोस्ट डोंगरगाव तह भद्रावती जिल्हा चंद्रपूर. वय 50 वर्ष धंदा शेती यांनी काल दिनांक 22/6/2024 रोजी पेरणीच्या हंगामा वेळी लागवडी करिता व इतर लोकांच्या कर्जापाई अखेर पाण्यात बुडून आत्महत्या केली.
त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकाला 6एकर जमीन चोपण रिट सर्वे नंबर,76/2 असून त्यावर सीडीसी बँक नंदोरी,सोसायटी डोंगरगाव खडी चे 200000/ दोन लाखाचे व इतर काही लोकांकडून कर्ज घेतले होते.
त्यांचे मागे त्यांची पत्नी गिरजा विजय बोथले वय 45 वर्ष, मुलगा आशिष विजय बोथले, 31वर्ष, अशोक विजय बोथले 28 वर्ष, व आई व वडील असा मोठा आप्त परिवार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment