Ads

एकाच वेळेस दोन युवकाची रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याने भद्रावती शहरात खळबळ

भद्रावती जावेद शेख :-
भद्रावती तालुक्यातील मुरसा येथे रेल्वे पटरी जवळ दोन युवकांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्याकेल्याची घटना दिनांक24/6/2024रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे मृतक संदीप सहादेव बेलसरे वय 25 राहणार जामणी (आर ) तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती व दुसरा मृतक विजय तुलसाराम मावसकर वय 28 राहणार राहणार जामनी (आर ) असे हे दोन्ही मृतकाचे नाव आहे .
There is excitement in Bhadravati city as two youths committed suicide by falling down the train at the same time
तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे हे दोन्ही मृतक चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील कंपनीमध्ये रोज मजुरी साठी कामानिमित्त आले होते घटनेचा दिवशी हे दोन्ही मृतक मजदूर ठेकेदाराकडून काही रुपये घेऊन बाजार करिता गेली असता रात्रोला वापस आले नाही , मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह मुरसा येथील रेल्वे पटरी च्या बाजूला शेत शिवार लगत आढळून आले, याची माहिती लोको पायलट यांनी रेल्वे पोलिसाला कळविले व त्यानंतर याची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आले .मुरसा रेल्वे पटरीवर दोन युवक रेल्वेखाली आल्याची माहिती रेल्वे चालकांनी रेल्वे स्टेशनला दिली त्यानुसार भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतकाचे पंचनामा करण्यात आले त्यांचे शव ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आणण्यात आले घटनेच्या पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment