Ads

गांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी भाजपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती शहरात अलीकडे गांजा विक्रेते अतिशय सक्रिय झाले असून शहरातील अल्पवयीन तथा तरुण मुले-मुली गांजा सेवनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. गांजाच्या आहारी गेल्यामुळे या तरुणांचे व विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होत आहे.गांजामुळे अनेक तरुन गुन्हेगारीकडेही वळत असल्याचे दिसून येत आहे.
BJP's statement to Superintendent of Police to take action against ganja sellers.
या गंभीर बाबीची दखल घेऊन शहरात गांजाची तस्करी व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करून त्यांना शहरातुन हद्दपार करण्याची मागणी भद्रावती येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इमरान खान यांच्या नेतृत्वात भाजयुमोतर्फे पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजयुमोतर्फे या संबंधात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते.याची दखल घेत मुनगंटीवार यांनी देखील पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून गांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment