Ads

जिवतीत ऑटोमोबाईल आणि किराणा दुकानाला भिषण आग,लाखोंचे नुकसान

जिवती :- शहरातील बाजारपेठत असलेल्या प्रितम नगराळे यांच्या आई ऑटोमोबाईल आणि योगेश भदाडे यांच्या किराणा दुकान व कापड केंद्राला शनिवारी मध्यरात्री अचानक भिषण आग लागून दोन्ही दुकाने संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली.या घटनेत आई ऑटोमोबाईल चालक प्रितम नगराळे यांचे जवळपास २५ लाखाचे तर भदाडे किराणा दुकान व कापड केंद्राचे चालक योगेश भदाडे यांचे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.हे दोन्ही दुकाने होलसेल असल्याने मोठ्या प्रमाणात दुकानात सामान भरलेले होते त्यामुळे मोठा नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
Heavy fire to automobile and grocery store in Jivita, loss of lakhs
प्राप्त माहितीनुसार प्रितम नगराळे व योगेश भदाडे यांनी नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेत दुकाने बंद करून घराकडे गेले होते.मध्यरात्री अचानक दोन्ही दुकानाला आग लागली होती या आगीचा भडका आणी धूर शेजारच्या डॉ.अंकूश गोतावळे यांच्या घरात घुसल्याने जाग आली त्यामुळे हि घटना लक्षात आली दुकानाला आग लागल्याची माहिती सदर दुकानदारांना कळवत आग विझविण्यासाठी नगरपंचायतच्या अग्नीशमन दलाला कळविले मात्र वेळेत अग्निशमन दल पोहोचली नाही.दोन्ही दुकाने संपूर्ण खाक झाल्यावर अग्नीशमन दल पोहोचले शहरात अग्नीशमन यंत्रणा राहूनही कामी पडत नसेल आणि वेळेत पोहोचत नसेल तर यंत्रणा काय कामाची असा सवाल उपस्थित होत असून स्थानिक शासन प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.दुकानाला लागलेली आग नेमकी कशामुळे लागलेली आहे हे अद्याप स्पष्ट नाही मात्र शार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.किराणा दुकानातील प्लास्टिक पिशव्या,तेल व कागदामुळे तर लगतच्या ऑटोमोबाईलमधील इंजिन ऑईल,टायर्समुळे आग झपाट्याने पसरली असल्याचे बोलले जात आहे.
• आई वडिलांचे छत्र हरविलेल्या देवलागुडा येथील प्रितम नगराळे व शुभम नगराळे यांनी दोन्ही भावंडांनी जिवती आई ऑटोमोबाईल नावाने दुकान उघडले.दोन्ही भावांचा मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने व्यवसायात पकड निर्माण करत गावात वेगळी ओळख निर्माण केली होती.कुठलाही आधार नसतानाही व्यवसायाच्या माध्यमातून जम बसवलेल्या या होतकरू तरुणांचा आगीच्या तांडवामुळे स्वप्नांची राखरांगोळी झाली.मेहनतीच्या बळावर फुललेल्या व्यवसाय आगीत खाक झाल्याने डोळ्यात अश्रू वाहताना पाहताना मिळत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment