जावेद शेख भद्रावती:- भद्रावती.
राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीमधील सण 2005 नंतरच्या संवर्ग अधिकाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतनाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. त्यामुळे नगरपरिषद संवर्ग अधिकार्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
City council cadre officers are on indefinite hunger strike in front of Bhadravati city council office for the old pension scheme.
सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांच्या अन्य मागण्या पूर्ण कराव्या यासाठी भद्रावती नगर परिषद कार्यालयातील संवर्ग अधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक 29 पासून बेमुदत संप पुकारला आहे. सदर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वी या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांना बेमुदत संपाचा मार्ग अवलंबावा लागला आहे.
0 comments:
Post a Comment