Ads

कन्नाके परिवाराने केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प........

चंद्रपुर :-छत्रपती नगर तूकुम चंद्रपूर येथे वास्तव्याला असलेले राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष आणि सुविख्यात समाजसेवी डॉक्टर देव कन्नाके यांनी त्यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून त्या प्रकारचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे संकल्प पत्र नुकतेच भरून दिले आहे.
The Kannake family decided to donate the body after death.

अखिल भारतीय अनिस तर्फे राबविण्यात येणाऱ्या देहदान व नेत्रदान चळवळीला भरीव सहकार्य देत अभा अनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने यांच्याकडे ते संकल्प पत्र त्यांनी भरून दिले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या या आदर्श संकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या सहचारीणी ईश्वरी यांनी पती डॉक्टर देव कन्नाके यांच्या विचाराला अनुमोदन तर दिलेच परंतु स्वतःचा पण मरणोत्तर देहदानाचा विचार बोलून दाखवून स्वतःचा पण फार्म भरून दिला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार डी के आरीकर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे उपस्थित होते. कन्नाके परिवाराने दाखविलेल्या या वैचारिक धारिष्ट्याचे समाज मनात कौतुक होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment