राजुरा :-श्रीगुरुदेव सेवा मंडळ सहकार नगर रामपूरच्या वतिने सामुदायिक प्रार्थना घेऊन "आगस्ट क्रांती पर्व" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव राजूरकर तसेच प्रमुख अतिथी मोहनदास मेश्राम, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा, तालुका प्रमुख, यांची उपस्थिती होती.
Rashtrasant Tukdoji Maharaj's bhajan ignited the August revolution and lit the torch of independence.
- Mohandas Meshram, G.G.V.P., Taluka Head
महात्मा गांधी यांच्या "चलेजाव चळवळ आणि करो या मरो" या नाऱ्याला प्रतिसाद देत वंदनीय महाराजानी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला व आपल्या तत्त्वज्ञानाचा वापर करून, झाड झडुले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बाम बनेंगे, नाव लगेगी किनारे अश्या भजनातून जनसामान्यात जागरूकता निर्माण केली व ब्रिटिशांना हाकलून लावले . म्हूणन चिमूर हे गाव 1942 ला स्वतंत्र झाले यासाठी व. महाराजांचे खूप मोठे योगदान आहे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मोहनदास मेश्राम यांनी व्यक्त केले. तर जनसामान्यांवर ब्रिटिशाद्वारे होत असलेल्या अत्याचारातून सुटका करण्यासाठी जनसमुदाय एकत्र आणायचे त्यांच्यात अन्याया विरुद्ध लढण्याची ताकद महाराजांनी आपल्या विचारून निर्माण केले असे मत अध्यक्ष मारोतराव राजूरकर यांनी व्यक्त केले. सत्कारमूर्ती गुरुदेव सेवा मंडळच्या उपासक उज्वला धोबे यांना मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्थाविक अनिल चौधरी यांनी केले, संचालन सुवर्णा चोखारे तर आभार देविदास वांढरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी बुटले, पार्वता मोहितकर,प्रतिभा बोढे, प्रियंका कोकोंडावर,सरिता मोहितकर, नानेबाई आस्वले, लता धोबे,मंदा पोराटे,नलिनी मेश्राम, नलिनी लांडे, श्रावणी चोखारे, अवंती चोखारे,चन्ने, प्रकाश उरकुंडे,गजानन बोढे, एकनाथ कार्लेकर,उत्तमराव अवघडे, आत्माराम शेंडे,ह. भ. प.नामदेव आवारी, सुरेश बेले, रामप्रसाद बुटले,रंगराव शेंडे, बळीराम बोबडे, नामदेव लांडे, विजय वांढरे, गणेश कुडे, उज्वल शेंडे ,सोमनाथ सपाट,बाळकृष्ण तानकर,पवनकर, इत्यादी श्रीगुरुदेव सेवा मंडळचे उपासक, उपासिका यांनी परिश्रम घेतले व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 comments:
Post a Comment