राजुरा :-राजुरा वन परीक्षेत्र अंतर्गत होणाऱ्या वन गुन्ह्यावर आळा घालण्याकरिता श्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग यांनी नुकतीच राजुरा येथे सभा घेऊन सर्व अधिकारी कर्मचारी यांना कठोर कारवाई करण्याकरिता अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीवर आळा बसविण्याकरिता रात्रपाळी व दिवस पाळी नियमित गस्त करून तसेच गुप्त बातमीदार मार्फतीने माहितीचे संकलन करून अधिकाधिक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यामुळे
Forest department on action mode to curb forest crime.
राजुरा येथे नव्याने रुजू झालेले पवन कुमार जोंग, उपविभागीय वनाधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश डी. येलकेवाड यांनी विविध पथक तयार करून राजुरा परिक्षेत्रातील सर्व संशयित ठिकाणी वन गुन्ह्यावर आळा घालण्याकरिता दिवस पाळी व रात्रपाळी पथकाद्वारे मागील दोन दिवसात अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या व भरत असताना मोक्यावर पकडून पाच ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विरुद्ध POR जारी करण्यात आलेला आहे.
0 comments:
Post a Comment