घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
घाटंजी तालुक्यातील पारवा सर्कल मधील सावंगी संगम ते धामणदरी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे,
प्रत्येक निवडणुक पूर्वी राजकिय नेते फक्त आश्वासनच देतात. नंतर मात्र या गावाकडे राजकीय नेते आणि प्रशासनाचे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करतात, गावामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. शिक्षकांना शाळेत येण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडाव लागत आहे,
जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. घाटंजी तालुक्यातील सावंगी संगम ते धामणदरी रस्ता ‘आहे की संपूर्ण गायब झाला आहे’ अशी स्थिती दिसून येत आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यात जणू पाण्याचे तळेच साचले आहे. एका बाजूने रस्ता खचत आहे, या रस्त्यावरून पायी चालणे, दुचाकी चालवणे तर अशक्य आहे. त्यामुळे आपल्या शेतीतील कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे हाल होत आहेत.
या गावात ग्रामसेवक, तलाठी तीन- तीन महिने लोटून सुद्धा भेट देत नाही आहे,अशा अधिकाऱ्यांना वाटते आपल्यावर कुणाचा वचकच नाही. ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतातील कामात व्यस्त असतात, त्यामुळे ते त्रास सहन करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या आवाजाची दखल तरी कोण घेणार? म्हणून सुस्त प्रशासन आणि त्यातील निष्क्रिय अधिकारी यांचे फावते किंबहुना डागडुजीचा अथवा रस्त्याच्या दुरुस्तीचा खोटा खर्च दाखवून ते पैसे खिशात तर घालत नाही ना? त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. असे गावकऱ्यांनी सांगितले. तेव्हा धामणदरी येथील गावकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आहे कारण समोर विधानसभा असल्याने येथे अनेक राजकीय नेते धाव राहणार आहे तेव्हा अनेक आश्वासन भेटतील परंतु आता काय हा प्रश्न सर्वत्र शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पडला आहे
0 comments:
Post a Comment