Ads

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपींकडून धारदार तलवार जप्त

चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करून कारवाई सुरू केली आहे.
A sharp sword was seized from the accused in the action of the local crime branch
28 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. ज्यामध्ये चंद्रपूर शहरातील राजीव गांधी वार्ड रयतवारी येथील घरात धारदार शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. माहितीच्या आधारे आरोपी राहुल उर्फ ​​अजय गिरीधर मदनकर याला ताब्यात घेऊन राहुलच्या घराची तपासणी केली असता एक लोखंडी धारदार तलवार आढळून आली. या कारवाईत 500 रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्यात कलम 4,25 भारतीय शस्त्रास्त्रे 834/2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विनोद भुर्ले, नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल्ल घरघाटे व टीमने केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment