वरोरा- आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो,देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैल पोळा या दिवशी आपला सखा साथीदार ज्याच्या बळावर काळ्यामातीतुन सोन उगविण्यासाठी रात्रंदिवस शेतकर्याच्या सोबत असतो तो म्हणजे बैल.त्याच्या कष्टाचे उपकार फेडावे म्हणुन महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो.आज जरी शेती यंत्राच्या माध्यमातुन केली जाते तरी बैल हा महत्वाचा आहे बहुतेक कामे बैलाच्या माध्यमातुनच केली जाते.
शहरी भागातील बर्याच लोकांचे शेती व गावाशी नाळ जुळलेली आहे त्यांना बैल पोळ्याला सुट्टी नसल्यामुळे आपल्या गावी जाणे शक्य होत नाही व शहरातील मुलांना पोळा या सणाबद्दल फार उत्सुक्ता नसते तेव्हा शेतकर्यांना खरच अन्नदाता,राजा समजत असाल तर पोळा या सणाला शासकीय सुट्टी जाहीर करावी असे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत नायब तहसिलदार वरोरा यांना देतांना डाॅ.चेतन खुटेमाटे मार्गदर्शक अन्नदाता एकता मंच,अनुप खुटेमाटे संस्थापक अन्नदाता एकता मंच,संदीप सोणेकर,संकेत गोहोकार,सचिन खुटेमाटे,स्वप्निल टाले,निलेश खुटेमाटे,संजय चिडे,अमित डोंगे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment