बल्लारपूर :-बल्लारपूर पोलीसांना आज दि.२३/०९/२०२४ चे राजी २१.०० ते २१.३० वा. चे सुमारास मुखबिरने माहिती दिली की, कन्नमवार वार्ड येथील राकेश कुमारस्वामी सुरमवार हा त्याचे राहते घरी अवैध्यरित्या विदेशी दारुचा मुद्देमाल आणला आहे
Ballarpur police raided and arrested two people who were selling illegal foreign liquor
अशी मुखबिरव्दारे खबर मिळाल्याने खबरेची शहानिशा करण्याकरिता पंचासह पो. स्टॉफ रवाना होवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन विदेशी दारु मिळुन आली कि.अं. ८९,२८०/-रु. एकुण ६ खोक्यात प्रत्येकी खोक्यात १२ नग रॉयल स्ट्रग कंपनीच्या बॉटल प्रत्येकी नग १२४०/-रु. प्रमाणे एकुण. ८९,२८०/-रु. दारुचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीत १) कुमारस्वामी सुरमवार 37 वर्षे रा. कन्नमवार वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर,२) सुरज कुमारस्वामी सुरमवार वय-२७ वर्षे रा. कन्नमवार वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन कलम ६५ (ई),८३ महा.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सा.ल अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनाल पो.नि.सुनिल वि.गाडे, सपोनि. अंबादास टोपले, पोउपनि, हुसेन शहा, सफी. गजानन डोईफोडे, पोहचा सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहया, रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. विकान जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं, अनिक नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment