सादिक थैम वरोरा:- पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध दारू विक्रेत्यां बाबत राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सत्कार करून घेतला आरोपी देवेंद्र उर्फ देवा भानुदास मोहुर्ले वय42 वर्ष याचे विरोधात कारवाई करत त्याचे जाऊन दारू सहदुसष्ट हजाराचा माल जप्त केला.
आरोपी हा त्याचे मोपेड ज्युपीटर गाडीच्या पायदानावर एका चुगडीत देशी दारु घेवुन जात आहे. अशी माहिती मिळाल्याने नाकेबंदी करुन प्रोव्हीरेड केली असता चुंगडीतील 200 नग 90 एम.एल.च्या देशी दारु रॉकेट संत्रा कंम्पनीच्या सिलबंद शिश्या , गुन्हात वापरलेली मोपेड ज्युपीटर टी.वी.एस. कंम्पनी क्र. एम.एच.34बि. वाय 4789 कि.60,000 रु. असा एकूण 67,000/- रु चा माल बिनापरवाना अवैद्यरित्या वाहतुक करतांना आढळून आला.
सदर आरोपीस दारुसाठा कोठून आणला याबाबत विचारणा केली असता आरोपीने येथील नेहरू चौकातील निर्बान वाईन शाँप येथून घेतले.यामुळे निर्बान वाईन शाँप मालकावर सुद्धा कलम 65 (अ) 83 मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
तसेच यापुढे सुद्धा देशी दारु व विदेशी दारु भट्टी मालक (दुकानदार) यांनी परवान्यात नमुद प्रमाणापेक्षा अधिक दारुची अवैद्यरीत्या विक्री केल्यास किंवा अवैद्य दारु वाहतुक केल्यास,त्याचेवर गुन्हा दाखल करुन, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व सबंधीत देशी व विदेशीदारु भट्टीचा परवाना रद्द करणे बाबत राज्य उत्पादन शुल्क यांनी अहवाल पाठवून परवाना रद्द करण्यात येईल.
ही कार्यवाही सहाय्यक पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, पोहवा दिलीप सुर, दिपक दुधे, मोहन निसाद, पो.अ. फुलचंद लोधी, विशाल राजुरकर, महेश गावतुरे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment