Ads

शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व सिकल सेल तपासणी शिबिर संपन्न.

राजूरा :-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने मार्गदर्शक म. रा. मराठी पत्रकार संघ, राजुरा तथा तालुका अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राजुरा चे प्रा. अनंत डोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट व सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन आदर्श हायस्कूल, राजुरा येथे करण्यात आले.
Blood group and sickle cell screening camp for school students concluded.
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे अध्यक्ष सतीश धोटे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली झलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श हायस्कूल, राजुराचे मुख्याध्यापक एस. डी. जांभुळकर हे होते. सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे, प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक शाळा, राजुराच्या मुख्याध्यापिका एन. पी. पिंगे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे प्रदेश अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे अध्यक्ष सतीश शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे सचिव ॲड. राहुल थोरात हे होते तर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, राजुराचे आरोग्य सेविका पूजा गायकवाड व शुभांगी पुरटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
आदर्श हायस्कूल, राजुरा येथील ८ ते १० वी च्या १०० विद्यार्थ्यांनी रक्तगट व सिकल सेल शिबिरात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले. याप्रसंगी पत्रकार संघाचे सहसचिव कैलास कार्लेकर, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार, संघटक लोकेश पारखी, प्रसिद्धी प्रमुख अंकुश भोंगळे, रत्नाकर पायपरे, गौरव कोडापे, संतोष देरकर नागपूर विभाग सहसचिव , नेफडो, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment