जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती : वरोरा शहर आणि तालुक्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसन गावातील नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला, विशेषतः खेड्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या बैलबंडीसह मोर्चात भाग घेतल्यामुळे आंदोलनाचे दृश्य अत्यंत प्रभावी बनले.
Grand march in Warora led by Sheikh Zairuddin alias Chotubhai; Participation of farmers with bullock carts, warning of redressal of demands within 15 days
मोर्चातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनासमोर आपले प्रश्न मांडले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पळसगाव आणि रानतळोधी पुनर्वसन गावातील नागरिकांच्या समस्यांचा समावेश आहे. तसेच, अवैध उत्खननाविरुद्ध कठोर कारवाई, प्रलंबित कृषी पंप कनेक्शन पूर्ण करणे, अतिक्रमणधारकांना पट्टे देणे आणि वाढलेल्या विद्युत दरांमध्ये कपात करणे हे मुद्दे समाविष्ट आहेत.
शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांनी प्रशासनाला इशारा दिला की, "जर १५ दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही." बैलबंडीसह शेतकऱ्यांचा सहभाग आंदोलनाला अनोखा ठरला आणि मोठे बळ प्राप्त झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरवात झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, अतिक्रमणधारक, अपंग, आणि निराधार प्रकल्पग्रस्तांनी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, मोर्चाच्या आयोजनासाठी नागरिकांनी स्वतःच्या बैलबंडीसह सहभाग नोंदवला, ज्यात महिलांची व लहान मुलांची मोठी उपस्थिती होती.
मोर्चाच्या समारोपात उपविभागीय अधिकारी झेनिथ चंद्र यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित विभागांना माहिती पाठवून लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी छोटूभाई शेख आणि इतर शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थि
रुहिना छोटूभाई शेख माजी महिला बालकल्याण व शिक्षण सभापती वरोरावसंतराव विधाते कैलास जी कुंमरे सरपंच रानतळोदी रघुनाथ दडमल जावेद अंसारी फारूक शाह मोहसीन पठाण शब्बीर शेख शेषराव भोयर भोयर बाई सरपंच आशी,माजी सरपंच पूर्णिमा गाऊत्रे पळसगाव महेश धुर्वे प्रफुल्ल शेडमाके विलास आत्राम अंकुश प्रचाके रमेश मेश्राम अक्षय मिळावी कैलाश राम तळोदी मंगलदास आत्राम आनंदराव चिडाम गोविंदा काजल नितेश असे कर शुभांगी कुंभारे नासिर भाई शेख यावेळी शेतकरी शेतमजूर महिला कामगार. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन गावातील नागरिक महिला कामगार लहान मुले जवळपास 2 हजाराच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होते यावेळी छोटूभाई यांनी उपस्थित. नागरिकांचे आभार व्यक्त करताना सांगितले यापुढे सदर मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन व आंदोलन उपोषण करण्यात येईल
0 comments:
Post a Comment